- ‘वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या एक पुरूष दलाल आरोपीस गुन्हे शाखेकडून अटक ।
डोंबीवली : ‘ ठाणे शहराच्या “दक्ष लॉजिंग अॅन्ड बोर्डीग” पिंगारा रेस्टॉरंट अॅन्ड बारचे बाजुला, पीसवली गाव, टाटा पॉवर कंपनी, डोंबिवली पूर्व, कल्याण, जि. ठाणे” या ठिकाणी एक पुरुष दलाल काही पिडीत व असहाय्य महिलांना फुस लावून नमूद लॉजवर वेश्यागमनासाठी बोलवणार आहे अशी गुप्त माहिती, गुप्त माहितीदारामार्फत ठाणे गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वपोनिरी/अंजली आंधळे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर या शाखेने दिनांक २२/०७/२०२६ रोजी १७.२५ वाजता “दक्ष लॉजिंग अॅन्ड बोडींग” पिंगारा रेस्टॉरंट अॅन्ड बारचे बाजुला, पीसवली गाव, टाटा पॉवर कंपनी, डोंबिवली पुर्व, कल्याण, जि. ठाणे” या ठिकाणी सापळा लावून एक पुरुष दलाल आरोपीस १७:२५ वाजता ताब्यात घेवून लागलीच अटक करून त्याचे तावडीतून ०२ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. सदर पुरुष दलाल आरोपी व एक पाहिजे आरोपी यांचे विरुध्द मानपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथे दिनांक २३/०७/२०२६ रोजी ०३:४१ वा. गुन्हा रजि. नंबर ६१६/२०२६ भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १४३ (१), १४३ (३), ३ (५) सह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ३, ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच ०२ पिडीत बळीत महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मा. अधिक्षक, शांतीसदन, उल्हासनगर येथे ठेवण्यात आले आहे. सदर कारवाई ही अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे तसेच मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वपोनि/अंजली आंधळे, सपोनि / स्नेहल शिंदे, मपोउपनि दिक्षा ढाकरे, श्रेणीपोउपनि निलेश क्षिरसागर, सपोउपनिरी/व्ही.आर.पाटील, पोहवा / ७३९ डी.पी. महाले, पोहवा / ३६६३ आर. यु. सुवारे, पोहवा /१७४५ व्ही. जी. नाईक, मपोहवा/३६२९ ए.एस. मोरे, मपोअंम/८१३१ पी.जी. खरात, मपोअंम/२१७ एच. आर. थोरात, चापोअंम/५५१९ निकम यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे ।
