- कल्याण लोकसभा मतदारसंघात दहा लाख वह्यांचे वाटप ।
- खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिक्षणाला बळ देणारा लोकहिताचा उपक्रम ।
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यंदा तब्बल दहा लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ मतदारसंघातील हजारो विद्यार्थ्यांना मिळणार असून विशेषतः गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरणार आहे. शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा आणि विकासाचा महत्त्वाचा पाया मानला जातो. कोणताही विद्यार्थी शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यंदा ही कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरांमध्ये, ग्रामीण भागात तसेच शाळांमध्ये वह्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे पालकांवरील शैक्षणिक खर्चाचा भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अधिक उत्साहाने करता येणार आहे. शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने प्रयत्नशील आहेत.कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व घटकांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचावा यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वह्यांचे वाटप करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे ।
