नगररचना विभागात बदल्या की सेटिंग? केडीएमसीत २४ वर्ष ठाणमांड्या अभियंत्याची बदली, पण दुसऱ्याची गुपचूप एंट्री चर्चेत

  • नगररचना विभागात बदल्या की सेटिंग? केडीएमसीत २४ वर्ष ठाणमांड्या अभियंत्याची बदली, पण दुसऱ्याची गुपचूप एंट्री चर्चेत
  • केडीएमसीत नियमात पक्षपात 

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागातील ‘ठाणमांड्या’ अभियंत्यांच्या अखेर बदल्या झाल्या आहेत. २४ वर्षे एकाच विभागात असलेल्या उपअभियंत्याला हटवण्यात आले असले तरी, १५ वर्षे बस्तान ठोकलेला एक अभियंता पुन्हा गुपचूप परतल्याने पालिकेत चर्चेला उधाण आले आहे.कोणत्याही विभाग तीन वर्षांपेक्षा जास्त वर्ष राहू शकत नाही तसा शासनाचा नियम आहे महाराष्ट्र कामगार अधिनियमात तयार केले आहे.कल्याण डोंबिवली पालिकेचा नगररचना विभाग हा नेहमीच पालिकेत आणि शासनस्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या आठवड्यात पालिका नगररचना विभागातील पदस्थापनेचा विषय विधान परिषदेत उपस्थित झाला होता. दोन दिवसांपासून समाज माध्यमांत पालिका नगररचना विभागातील वादग्रस्त कारभाराची जोरदार चर्चा समाज माध्यमांत सुरू आहे. या सर्व घडामोडी घडत असताना बुधवारी नगररचना विभागात २४ वर्ष आणि एक जण पाच वर्ष ठाण मांडून असलेल्या अभियंत्यांच्या आयुक्तांनी तडकाफडकी बदल्या केल्या. तर नगररचना विभागात १५ वर्ष बस्तान ठोकून गेल्या नऊ महिन्यापूर्वी बाहेर पडलेला एका अभियंता पुन्हा प्रभागातून नगररचना विभागात गुपचूप दाखल झाला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या २५ ते ३० प्रभागांपेक्षा पालिकेचा नगररचना विभाग, लेखा अभियांत्रिकी विभाग हे सर्वाधिक उलाढालीचे विभाग म्हणून ओळखले जातात. या विभागात वर्णी लावण्यासाठी अभियंता, कर्मचाऱ्यांची धडपड असते. नगररचना विभागात तर काही अभियंते नोकरीला लागल्यापासून आहे त्या पदावर आणि दालनात कार्यरत आहेत. पालिकेतील सात हजार कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी दोन ते तीन वर्षांनी बदल्या होतात. नगररचना विभागातील एकाही कर्मचारी, अभियंत्याची बदली करण्याचे धाडस पालिका प्रशासन प्रमुख अनेक वर्ष दाखवत नसल्याने आणि तीच प्रथा अनेक वर्ष चालू असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सगळ्या प्रकाराने विकासक, वास्तुविशारद आणि नगररचना विभागात तक्रारी घेऊन जाणारे नागरिक मात्र कमालीचे त्रस्त आहेत. पालिका नगररचना विभागात उपअभियंता देविदास हरिश्चंद्र जाधव २४ वर्ष ठाण मांडून आहेत. यापूर्वी प्रशासनाने त्यांच्या बदल्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी राजकीय दबाव आणून काही आमदारांची पत्रे आणून आपली बदली थोपविण्याचे प्रयत्न केले. या ठाणमांडे पध्दतीने इतर पात्र अभियंत्यांवर अन्याय होत आहे. जाधव यांची प्रशासनाने आता उप अभियंता पदोन्नत्तीने नगररचना विभागातून बदली केली आहे. जाधव यांना पालिकेच्या क प्रभागात पाणी पुरवठा विभागात पदस्थापना देण्यात आली आहे. मच्छिंद्र हंचाटे मागील पाच वर्षापासून नगररचना विभागात होते. पदोन्नत्तीने प्रशासनाने त्यांना उप अभियंता म्हणून बांधकाम विभागाचा जे आणि ड प्रभागात बदली केले आहे. या बदल्यांमुळे कार्यकारी अभियंता सुरेंद्र टेंगळे, उपअभियंता दीपक मोरे, ज्ञानेश्वर आडके या ठाणमांड्या अभियंत्यांच्या प्रशासन बदल्या कधी करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आडके नऊ वर्षापासून या विभागात ठाण मांडून आहेत. उपअभियंता सुनील पाटील पंधरा वर्षापासून नगररचना विभागात ठाण मांडून होते. गेल्या नऊ महिन्यापूर्वी त्यांची बदली नगररचना विभागातून क प्रभागातील बांधकाम विभागात झाली होती. प्रशासनातील दुय्यम वरिष्ठाशी सलगी करून पाटील यांनी नऊ महिन्यानंतर पुन्हा नगररचना विभागात