- आमदारांनी महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करू नये : गटनेते विश्वनाथ राणे
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत पुनर्वसन धोरणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (शिंदे गट) गटनेते विश्वनाथ राणे यांनी आमदारांनी महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट मत व्यक्त करत आमदार राजेश मोरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. महासभेत बोलताना राणे म्हणाले की, प्रत्येक रस्त्याच्या कामात तसेच छोट्या-छोट्या प्रशासकीय बाबींमध्ये आमदारांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यास समर्थ आहेत. या घडामोडींमुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ।
