- रील स्टार प्रेम भाटीचा अपघात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच , खडकपाडा पोलीस ठाण्यात ठेकेदाराधात गुन्हा दाखल ।
कल्याण : विकास कामे करताना बांधकाम साहित्य योग्य जागी ठेवावे हे कळत नसल्याने निपराध ,निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे . कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात रील स्टार प्रेम भाटी याचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी अखेर त्याची दुचाकी रस्त्यावर टाकण्यात आलेला खडीमुळे घसरली .या रस्त्याच्या काम घेतलेल्या ठेकेदाराने काम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेचे उपाययोजना केली नव्हती त्यामुळे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच प्रेम भाटी याचा अपघात झाल्याचे समोर आले आहे . याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी कामाच्या ठिकाणी निष्काळजीपण करत प्रेम भाटी याच्या अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महेश भोईर आणि गणेश पाटील या दोन ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .रस्त्ये गटारे बांधताना इतरस्त साहित्य टाकणाऱ्यांना जरप बसणार आहे ।
