- जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणनेस प्रारंभ करून महापालिकेस सहकार्य करावे!
- महापौर हर्षाली चौधरी व आयुक्त अभिनय गोयल यांचे आवाहन ।
कल्याण : भारताची जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याचा म्हणजेच स्वगणनेचा प्रारंभ आज पासून सुरू झाला आहे, या *पहिल्या टप्प्यात एक मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांनी स्वगणना करून* महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. आजच्या महाराष्ट्र दिनी *महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः स्वगणना करून* महापालिकेतील स्वगणना मोहिमेचा शुभारंभ केला. ही स्वगणना स्वतः करणे अतिशय सोपे असून यामध्ये 33 प्रश्नांची माहिती अचूक रित्या भरावयाची आहे आणि त्यानंतर प्राप्त होणारा SE ID (स्वगणना आयडी) जतन करून घरभेटी साठी येणाऱ्या प्रगणकाला देऊन सहकार्य करावे असेही आवाहन माहिती महापौर हर्षाली चौधरी यांनी यावेळी केले. या जनगणनेमुळे देशाच्या लोकसंख्येची अचूक माहिती उपलब्ध होईल त्यामुळे शहराच्या विकासाचे योग्य नियोजन करणे सुलभ होईल .ही *स्वगणना दिनांक 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतः* करावयाची आहे. भारतीय नागरिकांच्या सुविधेसाठी याची माहिती 16 भाषांमध्ये उपलब्ध असून 33 सोप्या प्रश्नांची अचूक माहिती आपल्याला वरील संकेतस्थळावर भरावयाची आहे अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. जनगणनेच्या जनजागृतीसाठी आज महापालिका मुख्यालयात महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी दोन सेल्फी पॉईंट्स अनावरण केले. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात जनगणनेच्या जनजागृतीसाठी उभारलेल्या शुभ्र धवल फलकावर महापौर हर्षाली चौधरी ,आयुक्त अभिनव गोयल तसेच उपस्थित पालिका सदस्य व इतर अधिकारी वर्ग यांनी आपल्या स्वाक्षरीची मोहर उमटविली ।
