लोकप्रतिनिधींना भेटीसाठी वेळ मिळत नसताना अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना थेट बैठकीत प्रवेश दिल्याचा :कंचन कुलकर्णी

  • लोकप्रतिनिधींना भेटीसाठी वेळ मिळत नसताना अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना थेट बैठकीत प्रवेश दिल्याचा :कंचन कुलकर्णी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात महापौरांच्या भेटीसाठी आलेल्या काँग्रेसच्या गटनेत्या कंचन कुलकर्णी यांना तब्बल दोन तास प्रतीक्षा करावी लागल्याने शुक्रवारी मोठा गोंधळ उडाला. लोकप्रतिनिधींना भेटीसाठी वेळ मिळत नसताना अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना थेट बैठकीत प्रवेश दिल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आलेल्या कुलकर्णी यांनी महापौर व प्रशासन लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचा आरोप केला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महापौर दालनाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर महापौरांनी स्वतः बाहेर येत त्यांची समजूत काढली आणि चर्चेसाठी दालनात बोलावले.दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी वादावर प्रतिक्रिया देताना आपण एका नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने भेटीसाठी आलो होतो, असे स्पष्ट केले. कोणालाही आडकाठी करण्यात आलेली नसल्याचे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले. या घटनेमुळे केडीएमसीतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील समन्वयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे ।