- रविंद्र चव्हाण यांनी विठूमाऊलीचे मनोभावे दर्शन घेत राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि समाधानासाठी प्रार्थना केली ।
डोंबिवली : आषाढी एकादशीचे औचित्य साधत डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ‘हरी ॐ रेल्वे प्रवासी भजन मंडळ’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक सोहळ्याला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या भक्तिमय कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थिती लावली. रविंद्र चव्हाण यांनी विठूमाऊलीचे मनोभावे दर्शन घेत राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि समाधानासाठी प्रार्थना केली. भजन, नामस्मरण आणि विठ्ठलभक्तीच्या सुरांनी रेल्वे स्थानक परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला ।

Post Views: 50