- शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेत आज “खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ।
डोंबिवली : शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेत आज “खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्न मांडले. यावेळी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी थेट संवादाचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या समस्या वेळेत सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, या उद्देशाने या जनता दरबार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांना दिलेले निवेदन स्वीकारून त्याबाबत ही योग्य कार्यवाही करण्याच्या सूचनाही केल्या. यावेळी आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, स्थानिक नगरसेवक, राजेश कदम, माजी नगरसेवक सदाशिव शेलार पदाधिकारी उपस्थित होते ।
