भिवंडी रोड,आसनगाव, बदलापूर रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत पुनर्विकास करा  खासदार सुरेश म्हात्रे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी ।

  • भिवंडी रोड,आसनगाव, बदलापूर रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत पुनर्विकास करा 
  • खासदार सुरेश म्हात्रे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी ।

कल्याण : भिवंडी,आसनगाव, बदलापूर या शहरांचा झपाट्याने विकास होत असून या शहरांमध्ये नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढ आहे.येथील भिवंडी रोड,आसनगाव व बदलापूर या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुविधा मिळाव्या यासाठी भिवंडी रोड,आसनगाव व बदलापूर या तिन्ही रेल्वे स्थानकांचा याअमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकास करावा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे यांची लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात खासदार म्हात्रे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन रेल्वे मंत्र्यांना दिले.

  •  नेरळ व कर्जत रेल्वे स्थानकांना स्वातंत्र सेनानींची नावे द्या- खा.बाळ्या मामा..

रायगड जिल्ह्यातील नेरळ व कर्जत या दोन्ही रेल्वे स्थानकांना स्थानिक स्वतंत्र सेनानींची नावे द्यावी अशी मागणी देखील खा.म्हात्रे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.नेरळ रेल्वे स्थानकाला ‘स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा वीर हिराजी गोमाजी पाटील नेरळ रेल्वे स्थानक’ असे नामकरण करण्यात यावे.तसेच कर्जत रेल्वे स्थानकाला ‘स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा वीर भाई कोतवाल कर्जत रेल्वे स्थानक’ असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी खा.म्हात्रे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.   नेरळ व कर्जत या दोन्ही रेल्वे स्थानकांना स्थानिक स्वातंत्र्यसेनानींची नावे दिल्यास त्यांच्या कार्याचा गुणगौरव होणार असून त्यामुळे स्थानिक युवक व नागरिकांना प्रेरणा मिळेल यासाठी आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे नामकरणाची मागणी केली आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खा.सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.