खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या निधीतून रस्ते काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ ।

  • खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या निधीतून रस्ते काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ ।

डोंबिवली : डोंबिवली (पश्चिम) येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या निधीतून रस्ते काँक्रीटीकरणाच्या महत्त्वपूर्ण विकासकामाचा शुभारंभ दिनांक २८/०६/२६ रोजी करण्यात आला.डोंबिवलीतील आमर गैलेक्सी- वृंदावन टॉवर- राजुनगर परिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात खासदार निधीतून होणाऱ्या या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नेहमीच कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांना प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असून, आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला. खासदार अनुपस्थितीत त्यांच्या वतीने आमदार राजेश मोरे हस्ते या विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शुभारंभ प्रसंगी मा. नगरसेवक जनार्दन म्हात्रे, नगरसेविका सौ. रेखा जनार्दन म्हात्रे, सौ. प्रियदर्शनी म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, वेदांग म्हात्रे, तसेच स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ।