- नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि नगरसेवक हरमेश मल्लेश शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण ।
कल्याण : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक बळ मिळावे आणि कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून तब्बल १० लाख वह्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत उपजिल्हाप्रमुख, नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी आणि नगरसेवक हरमेश मल्लेश शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचा लाभ मतदारसंघातील हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. “शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये,” या भूमिकेतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे नगरसेवक हरमेश शेट्टी यांनी यावेळी सांगण्यात आले. मोफत वह्यांच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांवरील शैक्षणिक खर्चाचा भार कमी होण्यास मदत होत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला मोठा आधार मिळत आहे. “शिक्षणाला बळ, विद्यार्थ्यांना आधार” या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली ।
