- “विजय आडवर्टायझिंग (जाहिरातदार )पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, २५ कोटी थकबाकी, ब्लॅक लिस्ट का नाही?
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेची २५ कोटींची थकबाकी ठेवणाऱ्या ” विजय आडवर्टायझिंग , पुन्हा दुसरी कामे का दिली. केडीएमसी अधिकारी ” विजय ॲडव्हर्टायझिंग ( VIJAY ADVERTISING)” इतके मेहेरबान का ? पालिकेची ची थकबाकी ठेवणाऱ्या “विजय ॲडव्हर्टायझिंग कंपनीला ब्लैक लिस्ट करा – काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी मागणी केली . केडीएमसी ची तब्बल २५ कोटी रुपयांची थकबाकी ठेवणाऱ्या “VIJAY ADVERTISING” या कंपनीला पुन्हा नवीन ठेका देण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी केडीएमसी प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कांचन कुलकर्णी यांनी संबंधित कागदपत्रे दाखवत, पालिका प्रशासनाने थकबाकीदार कंपनीवर कारवाई करण्याऐवजी तिलाच पुन्हा कामे देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल संताप व्यक्त केला. केडीएमसी ची २५ कोटी रुपयांची थकबाकी असताना या कंपनीला पुन्हा कामे कशी देण्यात आली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.दरम्यान यावेळी त्यांनी केडीएमसी अधिकारी ” विजय ॲडव्हर्टायझिंग वर इतके मेहेरबान का आहेत? असा थेट आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे सत्य काय बाहेर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ।

Post Views: 20