कल्याण काळा तलाव परिसरात व्यावसायिक वादातून जीवघेणा हल्ला; चौघांना अटक ।

  • कल्याण काळा तलाव परिसरात व्यावसायिक वादातून जीवघेणा हल्ला; चौघांना अटक ।

कल्याण : कल्याण पश्चिमेतील काळा तलाव व्यावसायिक वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास काळा तलाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. काळा तलाव पाहण्यात येणाऱ्या पर्यटक बुचकाळ्यात पडले होते.पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने परीसरात शांती पसरली आहे.  कल्याण काळा तलाव परिसरात ओमकार विठ्ठल सुरेश हे मोमोज स्टॉलचा व्यवसाय करतात. दुकान बंद करून ते आपल्या भाऊ उमेश याच्यासोबत घरी जात असताना आरोपी मुरलीधर नाडेकर, त्याचा मुलगा किरण नाडेकर, भावेश नाडेकर आणि त्यांचा साथीदार हार्दिक प्रजापती हे तेथे आले. यांच्यात पूर्वीपासून व्यावसायिक कारणावरून वाद सुरू होता. त्याच रागातून आरोपींनी ओमकार आणि उमेश यांच्याशी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भावेश नाडेकर याने सोबत आणलेल्या चाकूने उमेश सुरेश यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात उमेश यांच्या चेहरा, छाती आणि पोटावर वार करण्यात आले.घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी यांनी दिली असून पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस करत आहेत ।