डोंबिवली शहराचे सांस्कृतिक वैभव वाढत आहे. : आमदार रवींद्र चव्हाण

  • डोंबिवली शहराचे सांस्कृतिक वैभव वाढत आहे. : आमदार रवींद्र चव्हाण

डोंबीवली : पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. त्यामुळे वारीच्या काळात सांस्कृतिक डोंबिवली नगरीतही एक वेगळाच उत्साह जाणवतो. हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आरंभ प्रतिष्ठान ढोल ताशा पथकाच्या वतीने यंदाही मोठ्या जल्लोषात वारीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतीकात्मक वारीत आबालवृद्ध डोंबिवलीकर बंधू-भगिनी, विशेषतः चिमुकले विठ्ठलभक्त रममाण होऊन विठूनामाचा गजर करत होते. या सोहळ्याला उपस्थित राहून हरीनामात तल्लीन झालो. या वारीमुळे डोंबिवली विठ्ठलरंगात न्हाऊन निघाली. ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला वारीसाठी जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी पथकातील युवकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही ही माऊलींची वारी डोंबिवलीकरांच्या दारात आणली. वारीची परंपरा जपतानाच या उपक्रमातून डोंबिवली शहराचे सांस्कृतिक वैभव वाढत आहे. यासाठी आरंभ पथकातील सर्व युवक-युवतींचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण, उपमहापौर राहुल दामले, नगरसेविका मंदाताई पाटील, नगरसेविका सायलीताई विचारे, भाजपा डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर आदी प्रमुख मान्यवरांसह अनेक भाविक उपस्थित होते ।