शिवशक्ती भीमशक्ती कष्टकरी फेरीवाला विकास पॅनल ला सर्व फेरीवाला बंधू भगिनी यांनी निवडून दिले ।

  • शिवशक्ती भीमशक्ती कष्टकरी फेरीवाला विकास पॅनल ला सर्व फेरीवाला बंधू भगिनी यांनी निवडून दिले ।

डोंबीवली : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहर फेरीवाला समितीच्या निवडणुका घेतल्या. या निवडणुकीत फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींना शहर पथ विक्रेता समिती सदस्यत्व मिळून फेरीवाल्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या युनियन्सनी फेरीवाला एकीकरण समितीची स्थापना केली. फेडरेशनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली, फेडरेशनचे ज्येष्ठ नेते प्रशांत सरखोत, बबन कांबळे, प्रशांत माळी, संजय जाधव, उल्हास भोईर, आनंद दायमे, महेश भोईर, विजय कुंभार, शिवा मोरे व सर्व युनियनचे पदधीकारी व फेरीवाला यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती, भिमशक्ती, पथविक्रेता विकास पॅनलच्या माध्यमातून सदर निवडणूक लढविली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, जातीविरहीत, प्रांतवाद विरहीत व्हावी, यासाठी फेरीवाल्यांतर्फे निवडणूक आरक्षणासाठी एक एक उमेदवार देण्याचा प्रयत्न फेरीवाला एकीकरण समितीने केला, परंतु काही फेरीवाल्यांनी ही निवडणूक प्रांतवाद आणि पैसा यांच्या जोरावर लढवण्याचा प्रयत्न करून फेरीवाल्यांची एकता तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु फेरीवाल्यांनी त्यांची सेवा करताना आयुष्य वेचणाऱ्या फेरीवाला एकीकरण समितीचे उमेदवार १) भालचंद्र (भाऊ) पाटील, २) नाना पाटील, ३) दर्शना गायकवाड यांना प्रचंड बहुमतांनी तर ४) प्रशांत माळी, ५) रेखा सोनावणे, ६) आरती पोटावे, ७) आशा मगरे ८) रघुनाथ भोईर यांना बिनविरोध निवडून दिले. अशा पद्धतीने संपूर्ण शिवशक्ती भीमशक्ती कष्टकरी फेरीवाला विकास पॅनल ला सर्व फेरीवाला बंधू भगिनी यांनी निवडून दिले असून फेरीवाल्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी आशा फेरीवाले व्यक्त करत आहेत ।