कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ।

  • कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ।

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेत एका अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील लिपीकावर हा आरोप केला आहे. या लिपिकाने नोकरीच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2026च्या जानेवारी महिन्यात एका कामाच्या कारणावरून लिपिक भूषण पाटील आणि पीडित महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी लिपिक भुषण पाटील याने सर्वासमक्ष त्या पीडित महिलेला शिवीगाळ केली होती. या प्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित महानगरपालिका लिपिक भूषण पाटील याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, 2026च्या जानेवारी महिन्यात एका कामाच्या कारणावरून भूषण पाटील आणि पीडित महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2026 रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील याने रात्री पीडित महिलेला फोन करून तुला कामावरून काढण्याचे आदेश आले आहेत, ही कारवाई थांबवायची असेल तर मला काय देशील? असे म्हणत त्या पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पीडित महिलेने यापूर्वीही संबंधित कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील या अधिकाऱ्याविरोधात कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने या पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आणि महापालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील विरोधात तक्रार केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी महापालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही महिला कर्मचाऱ्यांनीही महापालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील विरोधात तक्रारी केल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे हे महापालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. पोलिस तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. महापालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला माहिती दिली आहे. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी कडक कारवाई केली आहे. महापालिका कर्मचारी लिपिक भूषण पाटील याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तपासावर कोणताही परिणाम होऊ नये, पुरावे नष्ट होऊ नयेत आणि साक्षीदारांवर दबाव येऊ नये, यासाठी ही कडक कारवाई आवश्यक असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. या प्रकरणात अधिक तपास मानपाडा पोलिस करत आहेत ।