- कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती,शिक्षण समिती आणि महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी उनमेदवारी अर्ज दाखल ।
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती,शिक्षण समिती आणि महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी उनमेदवारी अर्ज दाखल करणयात आले.दोन सभपती पद शिवसेना शिंदे गटाकडे तर एक सभापती पद भाजपकडे आले आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी मल्लेश शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शेट्टी हे जुने आणि अनुभवी नगरसेवक आहेत. शिंदे गटाने शेट्टी यांनाच सभापती दिले आहे । कल्याण डेांबिवली महापालिका स्थायी समिती सभापती,महिला बाल कल्याण समिती आणि शिक्षण समिती सभापती उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने शिक्षण समितीसाठी नवा चेहरा दिला आहे.प्रथमच निवडून आलेले अभिजीत थरवळ यांना शिक्षण समिती सभापती पद दिले आहे.त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आत्ता केवळ औपचारिकता राहिली आहे. शिवसेनेच्या जुन्या नगरसेवका सारीका जाधव यांना महिला बाल कल्याण समिती सभापती दिले आहे. स्थायी समिती सभापती पद मल्लेश शेट्टी यांना देण्यात आले.शेट्टी हे दोन वेळा स्थायी समिती सभापती राहिले आहेत. केडीएमसी तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच राहणार आहेत ।
