- ‘खासदार आपल्या भेटीला’ या उपक्रमाचे आयोजन संपन्न ।
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम येथील एस.एच. जोंधळे विद्यालयात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रविवार २३ तारखेला ‘खासदार आपल्या भेटीला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि विविध प्रलंबित कामांची सविस्तर माहिती खासदार साहेबांनी जाणून घेतली. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित अधिकारी व यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देत अनेक प्रश्नांवर जागीच कार्यवाही करण्यात आली, तर उर्वरित प्रश्नही प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. विविध विषयांबाबत नागरिकांनी सादर केलेल्या निवेदनांचीही दखल घेत, त्यावर योग्य ती कार्यवाही करून प्रश्न सोडविण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून घेणे नव्हे, तर त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करणे, हीच ‘खासदार आपल्या भेटीला’ या उपक्रमाची खरी ताकद आहे. जनतेच्या दारात जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेणारा आणि प्रश्नांच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणारा हा लोकाभिमुख संवादाचा प्रभावी उपक्रम कल्याण लोकसभा मतदारसंघात नियमितपणे राबविला जात आहे. डोंबिवलीतही या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. नागरिकांचा विश्वास, समस्या सोडविण्याची तत्परता आणि विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे ‘खासदार आपल्या भेटीला’ हा उपक्रम जनतेशी जोडणारा विश्वासाचा दुवा ठरत आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर अॅड. हर्षाली थवील – चौधरी, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते ।
