अ”प्रभागात भोंगळ कारभार ;वर्क ऑर्डर नसताना जलवाहिनी टाकण्याचा काम शिवसेनेची ठेकेदारावर कारवाईची मागणी ।

  • अ”प्रभागात भोंगळ कारभार ;वर्क ऑर्डर नसताना जलवाहिनी टाकण्याचा काम शिवसेनेची ठेकेदारावर कारवाईची मागणी ।

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत मनमानी कारभार सुरू आहे ठेकेदाराला वर्क ऑर्डर नसताना अ प्रभाग जलवाहिनी टाकण्याचे काम केले आहे त्यामुळे ठेकेदारांवर कोणाचा वचक आहे की नाही असे सतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे या भोंगाल कारभाराचा पडदा फास्ट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख शशिकांत ढोणे यांनी पाणीपुरवठा अभियंता यांना तक्रार द्वारे ठेका रद्द करून प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे ।कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मध्ये बिना वर्क ऑर्डर बिनदिक्कतपणे कामे केली जात आहेत .’अ’ प्रभाग क्षेत्र पॅनल २ शहाड येथील स्मशान भुमी मागे, भालचंद्र नगर या ठिकाणी महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला ४” इंच जलवाहीनी जोडुन पाणी पुरवठा केलेला आहे. तक्रारदार शिवसेनेचे शाखाप्रमुख शशिकांत ढोणे यांनी याबाबत डावरे साहेब आपणांस स्वतः विचारणा केली असता आपण संबधीत जलवाहिनीची वर्कऑर्डर झालेली नाही अशी माहिती मला दिली. या अर्थाने सिध्देश नामक के.डी.एम.सी. कॉन्ट्रॅक्टर याने कोणतेही परवानगी किंवा कुठलीही वर्क ऑर्डर नसतांना ही अनधिकृत जलवाहिनी जोडलेली आहे. याचा अर्ज हा कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या मनमानीने वर्क ऑर्डर नसतांनाही काम करीत आहे. हे कुणाच्या सांगण्यावरून होत आहे. याबाबत चौकशी करून यावर दंडात्मक कारवाई करावी तसेच यांचे लायसन्स रद्द करून त्यांचे कोणतेही बिल पास न करता.ठेकेदार आणि नगरसेवक स्थानिक यांच्या फौजदारी अशी योग्य कारवाई करावी । दरम्यान अप्रभात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे उभी राहत आहेत त्यात अनधिकृत बैठ्या चाळ्यांना राजरोसपणे जलवाहिनी टाकण्याचे काम पालिकेच्या खर्चातून केले जात आहे या अनागोदी कारभाराबद्दल पालिका आयुक्त अभिनव गोयल पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का अशी अशी मागणी होऊ लागली आहे ।