- कल्याणात १२५ ते १५० जणांना कुत्र्यांचा चावा केडीएमसी चे निर्बीजीकरण कागदावर नागरिकात संताप ।
कल्याण : कल्याण पश्चिम येथील ब ” प्रभाग कार्यालय हाकेच्या अंतरावर संदीप हॉटेल ते खडकपाडा परिसरात नागरिकांना अनेक जणांना भटक्या कुत्र्याने चावा घेत खळबळ वाजवली होती सायंकाळी ही घटना घडली आहे त्यानंतर पोलिसांनी आणि पालिका कर्मचाऱ्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेत त्याला पकडण्यात आले. कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला ,रस्त्यावर चालत असताना भटक्या कुत्राने १२५ ते १५० नागरिकाचे चावा घेतलं रात्री रविवारी सायंकाळी संदीप हॉटेल ते खडकपाडा रस्त्यावर घडला प्रकार जखमी नागरिक रुक्मिणी बाई आणि खाजगी रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले त्यात एका अकरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने श्वानांचे नसबंदी करण्यासाठी लाखोच्या ठेका दिला आहे मात्र त्याप्रमाणे काम होत नसल्याचे समोर येत आहे अनेक कुत्रे रस्त्यावर फिरताना दिसतात त्यांना कुठल्याही मज्जाव केला जात नाही आजच्या घडीला खडक पाडा बारावी गांधारी रिंग रोड, ख डेगोलवली, चिचपाडा कोळसेवाडी विठ्ठलवाडी तसेच कल्याण मधील ग्रामीण मधील मोहने, वडवली आंबिवली टिटवाळ्यातील काही परिसर देवाची, बेवारस कुत्र्यांचा हैदोस घातलेला दिसतो दरम्यान डॉक्टर संदीप पगारे केडीएमसी अनेकांना चावा घेतला असून त्यांचा उपचार खाजगी रुग्णालयात आणि रुक्मणी रुग्णालयात सुरू असल्याचे सांगितले ।
