- नगरसेविका दिपाली पाटील यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप ।
डोंबिवली : डोंबिवलीत शिवसेना आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका दत्तनगर नागरीक आरोग्य केंद्र तर्फे क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर पूर्वेकडील स्वर्गीय आनंद दिघे सभागृह येथे घेण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका दिपाली पाटील यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप करण्यात केल्या. यावेळी आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील, नगरसेविका दिपाली स्वप्नील पाटील, विभाग प्रमुख अॅड. स्वप्नील पाटील, माजी नगरसेविका अनिता मयेकर, शाखाप्रमुख गणपत बाणे, उपशाखाप्रमुख कृष्णा पाटील, शाखा संघटक अनिता बोरगे, विजया शिरोडकर, भावना पेडणेकर, हर्ष पेडणेकर, राजाराम सोष्टे, मीना पवार, अखिलेश राजपूत, विनायक टेंबे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली ।
