- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ग’ आणि ‘फ’ वार्डातील आपत्ती व्यवस्थापन सज्जतेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली ।
डोंबिवली : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ग’ आणि ‘फ’ वार्डातील आपत्ती व्यवस्थापन सज्जतेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मान्सूनपूर्व नियोजन, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या विविध समस्या व आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. पाणी साचणे, झाडे पडणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि जलनिस्सारण व्यवस्थेतील अडचणींवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मान्सून काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी २४ तास सज्ज राहावे, असे निर्देश उपायुक्त चव्हाण यांनी दिले. नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला सहाय्यक आयुक्त ( फ वार्ड ) प्रसाद ठाकूर, सहाय्यक आयुक्त ( ग वार्ड ) जयराम शिंदे, विद्युत विभाग, उद्यान विभाग, जलनिस्सारण (Storm Water Drain) विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ।
