कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ,साठ वर्षीय दोघे नराधमांना पोलिसांकडून अटक ।

  • कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ,साठ वर्षीय दोघे नराधमांना पोलिसांकडून अटक ।

कल्याण : कल्याण मध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.कल्याण पूर्वेतील ही अत्याचाराची महिला , चिमुरडीवरील चौथी घटना असल्याचे समजते,त्यामुळे कायदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी अख्तर मनियार आणि सलीम शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोघे साठ वर्षाचे आहेत. कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका परिसरात एका घरातून एका मुलीचा जोरात आवाज आला. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाग आली. लोकांनी घरात जाऊन बघितले तर घरात रक्त पसरले होते. झटापटीत रक्त निघणची शक्यता आहे , लोकांनी याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली. पोलीस घटना स्थळी दाखल झाले. यानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.आरोपींमध्ये अख्तर मणियार आणि सलीम शेख हे दोघे रात्री घरात एक पंधरा वर्षाची मुलगी घेऊन आले होते. तर मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीच्या व्यवसाय करतो . सलीम हा रिक्षा चालक आहे मुलगी गरीब घराची आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आता या प्रकरणात अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. अत्तर मणियार यांनी याआधी या मुली सोबत किंवा आणखी काही मुली सोबत असा प्रकार केला आहे का? त्याच्या या प्रकारात किती लोक आहेत? याचा तपास आता पोलीस करीत आहेत . मात्र या घटनेमुळे कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे । आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल अशी अशोक होनमाने/एसीपी यांनी दिली त्याचप्रमाणे कल्याण पूर्वेतील लोकप्रतिनिधी आणि जनता या कृत्याने संताप व्यक्त केला जात आहे ।