संकटमोचक मंत्री गिरीश महाजनांची यशस्वी मध्यस्थी , तीन दिवसानंतर आमदार रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन अखेर मागे ।

  • संकटमोचक मंत्री गिरीश महाजनांची यशस्वी मध्यस्थी , तीन दिवसानंतर आमदार रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन अखेर मागे ।

सोलापूर : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु होते. अखेर त्यांनी तीन दिवसानंतर उपोषण सोडले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी उपोषण मागे घेतले. २२ जूनच्या आधी मुंबईत बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती रोहित पवार यांनी सांगितले. आपल्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विचार सरकार करत आहे. या अटीसंदर्भात काय करता येईल यासाठी आपल्याला कमिटीकडे जावे लागेल असे महाजन यांन सांगितल्याचे रोहित पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या वतीने 4 जुलैला मोठे आंदोलन घेणार आहोत असे रोहित पवार म्हणाले. आपली बैठक ठरली आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले. कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे. मी ज्या मतदारसंघात काम करतो तिथेच अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आहे. सरकारनं काढलेला जीआर महत्वाचा आहे. सरकारचे अभिनंदन करतो. फक्त या जीआरमध्ये अनेक अटी आहेत. यामुळं अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. 2019 ची कर्जमाफी झाली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्यांना आताच्या या योजनेमध्ये लाभझाला पाहिजे. सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी आहे. रविकांत तुपकर बुलढाण्यात ते आंदोलन करत आहेत. त्यांना देखील भेटा असे रोहित पवार म्हणाले. रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजारांचे लिमिट आहे ते वाढवाले पाहिजे असे रोहित पवार म्हणाले. महात्मा फुले यांच्या नावाने 2019 मध्ये जी कर्जमाफी झाली, त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी लाभ घेतला, त्या शेतकऱ्यांना आताच्या या योजेनेमध्ये लाभ मिळू शकतो. या सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचा लाभ झाला पाहिजे. रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहे, पण यामध्ये वाढ करावी असी मागणी रोहित पवारांनी केली. या योजनेतील अटीमुळं अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, त्यामुळं या योजनेतील अटी काढाव्यात असे रोहित पवार म्हणाले. सरकारकडे चर्चेसाठी जाताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, रविकांत तुपकर, किसान सभेचे डॉ. अजित नवले, शेकापचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ हे सर्वजण येतील असे रोहित पवार म्हणाले ।