शिवसेना लोकप्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर।

  • शिवसेना लोकप्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर।

ठाणे : मीरा भाईंदर जवळील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे कल्याण – डोंबिवली येथील शिवसेना लोकप्रतिनिधींसाठी आज विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ।लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसतो, तर जनतेचा सेवक असतो, पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहा. संपत्तीपेक्षा माणसं कमवा, नागरिकांच्या फोनला प्रतिसाद द्या, त्यांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा. लोकांनी निवडून दिल्यानंतर आपण त्यांच्या सेवेत रुजू झालो, ही भावना कधीही विसरू नका असे याप्रसंगी नमूद केले. नगरसेवक म्हणून काम करताना महापालिका अधिनियम, नगरसेवकांचे अधिकार-कर्तव्य, अर्थसंकल्प, सभागृहाचे कामकाज, स्मार्ट सिटी, क्लस्टर डेव्हलपमेंट, पुनर्विकास, विषय समित्या, सोशल मीडिया, नागरिकांच्या तक्रारी, वाहतूक, रिंगरोड, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास यांचा अभ्यास प्रत्येक नगरसेवकाने केला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यावेळी शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , माजी खासदार आणि शिवसेना महाराष्ट्र संघटन प्रमुख आनंद परांजपे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे,आयुक्त अभिनव गोयल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी – थविल , गटनेते विश्वनाथ राणे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सूरज आव्हाड, डॉ.प्रकाश आवाडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि शिवसैनिक उपस्थित होते ।