- १ मे रोजी उपविभागीय अधिकारी कल्याण यांचे कार्यालयाचे प्रांगणात राज्याध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांचे शुभहस्ते पार पडला ।
कल्याण : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार दिनांक १ मे, २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कल्याण यांचे कार्यालयाचे प्रांगणात आमदार तथा भाजपाचे राज्याध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांचे शुभहस्ते पार पडला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, प्राचीन वास्तुकला, लोकसंस्कृती तसेच गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडले. हे प्रदर्शन निश्चितच स्तुत्य आणि प्रेरणादायी असून समाजात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करणारे आहे. यावेळी प्रांत अधिकारी विश्वास गुजर, सह पोलीस आयुक्त अनिल वनमाळी, पोलीस उपयुक्त अतुल झेंडे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते।
