कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ समितीच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर ।

  • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ समितीच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर ।

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ समितीच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या समितीत विविध पक्षांच्या नगरसेवकांना स्थान देण्यात आले असून एकूण 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेकडून प्रतीक पेणकर, अनघा देवळेकर, शालिनी वायले आणि दिपाली पाटील यांची शिक्षण मंडळ समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मनसेकडून प्रल्हाद म्हात्रे यांना समितीत स्थान देण्यात आले आहे.भाजपाकडून अभिजित थरवळ, जतिन प्रजापती, ॲड. कविता म्हात्रे, शामल गायकर आणि रसिका कृष्णा पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून अपर्णा भोईर यांची शिक्षण मंडळ समितीवर निवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थापनाशी संबंधित धोरणे, शाळांच्या सुविधा, तसेच शैक्षणिक उपक्रमांवर निर्णय घेण्यासाठी शिक्षण मंडळ समिती महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या समितीच्या नियुक्त्यांकडे शहरातील राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे ।