- खासदार कार्यालयाच्या वतीने एनसीएमसी कार्ड, आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
डोंबिवली : कल्याण ग्रामीण खासदार कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या (NCMC) एनसीएमसी कार्ड, आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याण ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक साहेब यांच्या पुढाकाराने NCMC (National Common Mobility Card) कार्ड, आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि शिबिराचा लाभ घेतला. सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक सुलभ आणि आधुनिक पद्धतीने लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने नागरिकांमध्ये या सुविधेबाबत विशेष उत्सुकता दिसून आली.सदर शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशा प्रकारची लोकाभिमुख शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षा अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याण ग्रामीण खासदार कार्यालयाचे प्रतिनिधी डॅनियल पीटर, दत्तात्रेय गोसावी आणि सुरेश ठाकरे तसेच शिवसेनेचे अनेक मान्यवर महिला पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.
