महात्मा फुले पोलीस स्टेशन समोर अतिक्रमण उभारणारा व्यक्तीवर ब” प्रभागाची कारवाई, तत्काळ शेड उध्वस्त ।

  • महात्मा फुले पोलीस स्टेशन समोर अतिक्रमण उभारणारा व्यक्तीवर ब” प्रभागाची कारवाई, तत्काळ शेड उध्वस्त ।

कल्याण : कल्याण डोंबिवली मध्ये तात्पुरते शेड उभारून बकालपणा करणारे फेरीवाले आणि शेड धारक यांना व प्रभाग कार्यालयाने मोठी चपराक उभारले आहे तक्रार येताच तात्काळ व प्रभाग कार्यालय चे अधिकारी सहाय्यक आयुक्त यांनी कारवाई करण्यात करून रस्ता मोकळा करून दिला आहे अशीच कारवाई तात्काळ झाल्यास प्रवाशांना, वाटसरू यांना तारेवरची कसरत करावी लागणार नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत दिसली जागा कर कब्जा असे प्रकार सारास सुरू असताना ब कार्यालयातील सहाय्यक आयुक्त यांनी मुख्य रस्त्यावर शेड उभारणार्‍या शेड माफियांवर तक्रारी नंतर तत्काळ कारवाई करण्यात आले आहे कल्याण पश्चिम येथील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन समोरच एका व्यक्तीने शेड उभारून व्यापार करीत होता त्याने चक्क तारपत्री बांधून मुख्य रस्त्यावरच आपले दुकान थाटले होते याची तक्रार सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांना केले असता अधीक्षक पल्लवी सुपे यांनी कर्मचाऱ्यांना बोलून तत्काळ कारवाई केली शेडवर त्यामुळे रस्ता अडवणाऱ्या जरप बसली आहे . आणि मुख्य रस्ता मोकळा करून दिला आहे त्यामुळे सर्व स्तरातून कौतुक केले जात असल्याचे,कारवाई झाल्याने अधिकाऱ्यांचे आभार मानले जात आहे ।