- संजय पावशे, अपर्णा संजय पावशे यांच्या शिवसेनेच्या वतीने गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या आणि छत्र्यांचे वाटप ।
डोंबिवली : ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी नगरसेवक संजय पावशे आणि अपर्णा संजय पावशे यांच्या कोपर रोड शिवसेना कार्यालयात शिवसेनेच्या वतीने गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संजय पावशे यांच्या लोकसंपर्कामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. वह्या व छत्र्या मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून आले. यावेळी उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले।
