देहविक्रीच्या रॅकेटमध्ये महिला ,वकिलाचा सहभाग ।

  • देहविक्रीच्या रॅकेटमध्ये महिला ,वकिलाचा सहभाग ।

कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात ठाणे गुन्हे शाखेच्या मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत कथित देहव्यापार रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणात एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून तिच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेली महिला कल्याण आणि पनवेल न्यायालयात वकिली करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सध्या न्यायालयाने या आरोपीला दहा तारखेपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावली आहे. गुप्त माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथील उडुपी पॅलेस हॉटेलवर सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपी महिला दलाला अधिवक्ता ( वकील) रंगेहात अटक करण्यात आली. आरोपीने २४ आणि २६ वर्षांच्या दोन पीडित महिलांना त्या ठिकाणी देहव्यापारासाठी आणले होते. पोलिसांकडून दोघींची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिलेविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आधी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आता पुन्हा न्यायालयात हजर केले असता दहा तारखेपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलीस तपासात संबंधित महिला कल्याण आणि पनवेल न्यायालयात वकिली करत असल्याची माहिती समोर आली असून, ती गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार चालवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित हॉटेल चालकाचा देखील यात सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत ।