- शहाड ते मोहने रोडला गॅरेज, वॉशिंग सेंटरचा विळखा ।
कल्याण : केडीएमसीच्या प्रभागात अ प्रभागाया हद्दीत मोठ्या प्रमाणात शहाड मोहने रस्त्याला गॅरेज, वॉशिंग सेंटर यांनी विळखा घातला आहे. रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागा दिसतील तिथे अनाधिकृत बांधकामे राजरोस पने उभारली जात असल्याने रस्त्यालगतच्या जागा मोकळ्या करणार तरी कधी अशी दबक्या आवाजात नागरिकांमधून चर्चा केली जात आहे.स्थानिक नगरसेवक आणि शिवसेना पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा पाठबळ असल्याने बेकायदेशीर शेड माफियांचा फावले आहे. कल्याण पश्चिमेतील शहाड ते मोहने रोडला गॅरेज, वॉशिंग सेंटर विळखा घातला आहे. त्यात माऊली वॉशिंग सेंटर, रॉयल ऑटो गॅरेज, सावरिया सेठ कार वॉशिंग सेंटर, वीर वॉशिंग सेंटर नूर पान शॉप आणि विमल पार्क इमारती लगत चिटकून दुकाने इत्यादी अनेक वॉशिंग सेंटर आणि गॅरेज यांनी आपले दुकान थाटले आहे. हा भाग अ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत येतो. रोडच्या बाजूला सुशोभीकरण चांगल्या प्रकारे केले आहे मात्र या झोपड्या उभारल्याने परिसराला बकालपण आले आहे. मोकळ्या जागांवर अनधि कृतपणे बांधकामे करण्यासाठी रोज हजारोंची उलाढाल होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे. या अनधिकृत बाधकामांबाबत अनेक तक्रारी केल्या तरी सुद्धा या वॉशिंग सेंटर आणि गॅरेज कंपनीवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे रस्त्याच्या केडला गाड्यांचा राबता असतो आणि अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते याचे काही देणे-घेणे नसल्याने बिंदिकतपणे व्यवसाय सुरू आहे.अनेक तक्रारी केल्या आहेत मात्र पालिका प्रशासन धृतराष्ट्रांची भूमिका निभावत आहे।प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी हे नेहमीच जनगणनेचे काम सुरू असल्याने कर्मचारी आणि अधिकारी व्यस्त असल्याचे कारण देत आहेत. राजकीय पक्षाच्या दबावाखाली जास्त दिसतात. जनगणनेचे काम झाल्यानंतर संबंधित गॅरेज आणि वॉशिंग सेंटरवर तोडक कारवाई केली जाईल अशी उडवा उडवीची उत्तरे देत पाठीशी घालीत असतात अशी माहिती नागरिकांनी दिली ।

Post Views: 147