मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या घरी दिली सदिच्छा भेट ।

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या घरी दिली सदिच्छा भेट ।

डोंबिवली : श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ डोंबिवली आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवली येथे आले असताना त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष , आमदार रविंद्र चव्हाण यांसोबत माजी आमदार सुभाष भोईर यांच्या शिळफाटा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली . माजी आमदार सुभाष भोईर याच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांचे औक्षण करून स्वागत केले तसेच शाल व पुष्पगुच्छ देवून संपूर्ण परिवाराने सत्कार देखील केला . माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भारत गिअर ते कल्याण फाटा व कल्याण शिळ रोड वरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भारत गिअर ते काटई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करून पहिला टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याची व मंजूर असलेले विकास बाह्य रस्ते (डीपी रोड ) यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्याच बरोबर दिवा शहरासाठी मंजूर असलेले स्वतंत्र दिवा पोलिस स्टेशन सुरु करण्याची विनंती देखील केली.तसेच कल्याण फाटा येथे प्रगतीपथावर असलेल्या श्री दत्त मंदिरासाठी अतिरिक्त निधी मिळावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष ,आमदार रविंद्र चव्हाण व माजी आमदार सुभाष भोईर यांनी प.पु.डी.के.दास महाराज सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट च्या माध्यमातून केली या वेळी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ बैठक लावण्याचे आदेश दिले व कोणत्याही प्रकारच्या निधीचि कमतरता पडणार नाही याची ग्वाही दिली . प्रसंगी नगरसेवक दिपेश म्हात्रे, महेश पाटील , नगरसेविका वेदिका साहिल पाटील, पूजा योगेश म्हात्रे , प्रतिक्षा जयेश पाटील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ।