डोंबिवलीत ‘लोन किंग’ बनून फिरणारा भामट्याला विष्णू नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

  • डोंबिवलीत ‘लोन किंग’ बनून फिरणारा भामट्याला विष्णू नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 
  •  १५ कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष; बिल्डरसह नामांकित वकील, रिटायर्ड ऐ सी पी यांची फसवणूक

डोंबिवली : गरजू व्यक्तींना कमी वेळेत“कोणालाही कितीही मोठे कर्ज मिळवून देतो” असे आमिष दाखवत लोकांना गंडा घालणाऱ्या डोंबिवलीतील निखिल भोईर या भामट्याला अखेर विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वतःची मोठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी तो कायम बाउन्सरची टीम आणि गनमॅनसोबत फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.डोंबिवलीतील एका नामांकित बिल्डरला तब्बल १५ कोटी रुपयांच्या कर्जाची गरज होती. त्याच वेळी त्याची ओळख निखिल भोईर याच्याशी झाली. “मी मोठमोठी कर्जे मंजूर करून देतो” असा विश्वास देत निखिलने बिल्डरकडून १५ कोटींच्या व्यवहारावर सव्वा टक्का कमिशन आधीच उकळले. त्यानंतर त्याने बिल्डरला ५ कोटी रुपयांचा चेक दिला. मात्र, तो चेक बाउन्स झाल्यानंतर संपूर्ण फसवणुकीचा पर्दाफाश झाला.या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी गजाआड केली आहे ।