- केडीएमसी मुख्यालयासमोर चार दिवसांपासून महिलेचे उपोषणाला
- बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करत नसल्याने पाऊल
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोड जवळील बेकायदेशीर बंगल्याचे बांधकाम निष्कासित करत नसल्याने चार दिवसा पासून ज्योती विनायक म्हात्रे ही महिला आमरण उपोषणात बसली आहे . ह” प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत कागदी घोडे नाचवत असून बांधकाम मात्र निष्कासित करत नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे ,राज्य सरकारने महिलांचा पुळका असल्याचं दाखवत महिला आरक्षण मध्ये महिलाना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी काँग्रेस विरोधात खडे फोडत होते आणि एकीकडे केडीएमसी मध्ये युतीची सत्ता असताना एका महिलेला उपोषणासाठी न्यायासाठी उपोषण करावे लागते ही खरंच लांच्छनास्पद गोष्ट आहे । ऐन कडाक्याच्या उन्हात पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ चार दिवसापासून अमर उपोषण सुरू केले आहे. तक्रार दार यांचे म्हणणे आहे,की ज्योती विनायक म्हात्रे व माझी बहीण श्वेता दिनेश खडकबाण. आम्ही दोघेही दि. २०/५/२०२५ रोजी महानगरपालिका च्या मुख्यालयाबाहेर उपोषणास बसलेलो होतो. अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्हाला महापालिकेने ही वेळ आणली होती. त्याचप्रमाणे मी गेले काही वर्ष आपल्या कार्यालयात अर्ज करून सुद्धा त्यावर कोणतेही तोडक कारवाई होत नसल्याने मला उपोषणाची वेळ आणली होती बांधकाम धारक नितीन नामदेव गायकवाड आणि श्री संजय नामदेव गायकवाड व इतर यांचे मौजे नवागाव सर्वे क्रमांक: २३३/३, या भूखंडावर बांधलेले बांधकाम हे महानगरपालिकेने अनधिकृत घोषित करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नव्हती त्यामुळे मी जेव्हा उपोषणाला बसली होती त्यावेळेस दुसऱ्यांदा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम *२६० [२]* व *४७८* अन्वयी सदरचे बांधकाम अनधिकृत घोषित केले व त्याचा पत्र मला दिला गेला होता पण त्यानंतर फक्त पोलीस स्टेशनला क. डॉ. म. पा. कडून दाखल झालेली *MRTP* *FIR No.०५०७ दिनांक* * २६/०९/२०२५ रोजी* दाखल केली मात्र बांधकाम निष्कासित करण्यास वॉर्ड अधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करीत राहिले आणि आमची दिशाभूल करत राहिले. म्हणून आम्ही पुन्हा १६/१२/२०२५. रोजी पुन्हा आमरण उपोषणासाठी क. डॉ. म. पा. च्या कार्यालयाच्या गेटवर बसलो होतो. तेव्हा सुद्धा आम्हाला पत्र देण्यात आले कि सदर अनधिकृत बांधकामावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर प्रक्रिया * (DPL)* पूर्ण झालेली असून त्या बंगल्यामध्ये रहिवास असल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६८ (५) अन्वये पोलीस यंत्रणेच्या मदतीने बांधकाम सामानासह रहिवास मुक्त करून निष्कषणाची कार्यवाही प्रस्तावित आहे. महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता संपुष्टास आल्यानंतर मुक्त उल्लेखित अनधिकृत बांधकामावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पोलीस यंत्रणेमार्फत अनधिकृत बांधकामातील रहिवास संपूर्ण सामानासहित रहिवास मुक्त करून पुढील निष्कषणाची कारवाई करण्यात येईल. दरम्यान चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या महिलेला केडीएमसी न्याय देणार की कारवाई साठी न्यायालयाची पायरी चढायला लावते हे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।
