- कल्याण मध्ये धक्कादायक प्रकार ,नऊ वर्षाच्या मुली सोबत अश्लीलकृत्य ।
डोंबीवली : कल्याण शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी कराटे प्रशिक्षकाला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. गिरीश वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या कराटे प्रशिक्षकाचे नाव आहे. आरोपी हा मुलांना कराटेचे प्रशिक्षण देत होता.मेजरमेंट घेण्याच्या नावाखाली त्याने नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याची तक्रार समोर आल्यानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपी गिरीश वाघमारे याला पोलिसांकडून थोड्याच वेळात कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.या घटनेने परिसरात खळबळजनक भीती पालक वर्गात उसळली आहे ।
