गुप्ते रोडवरील त्रिमूर्ती बिल्डिंगमधील दोन रूम असलेल्या घरातून गांजाची विक्री सुरू ,पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी घरातून 1 किलो गांजा जप्त ।

  • गुप्ते रोडवरील त्रिमूर्ती बिल्डिंगमधील दोन रूम असलेल्या घरातून गांजाची विक्री सुरू ,पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी घरातून 1 किलो गांजा जप्त ।

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड परिसरातील त्रिमूर्ती बिल्डिंगमधील एका घरावर विष्णूनगर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला आणि तब्बल 1 किलो गांजा जप्त केला.या कारवाईत निशिकांत पावशे आणि किसन गुप्ता या दोघांना अटक करण्यात आली आहे.गुप्ते रोडवरील त्रिमूर्ती बिल्डिंगमधील दोन रूम असलेल्या घरातून गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी घरातून 1 किलो गांजा जप्त करण्यात आला । अटक करण्यात आलेला निशिकांत पावशे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.तसेच एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचाही आरोप आहे. ही कारवाई विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी.गमे आणि त्यांच्या पथकाने केली.हा गांजा नेमका कुठून आणला जात होता?त्यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का?तसेच शहरात आणखी कुठे पुरवठा केला जात होता का? याचा सखोल तपास विष्णुनगर पोलीस करत आहेत. यापूर्वी अनेकदा गांजा तस्करी करणाऱ्या आरोपींना कल्याण डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन 31 लाखांच्या गांजा जप्त केल्याची माहिती दिली होती. या प्रकरणात तीन आरोपींना कल्याण पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले आहे. फक्त गांजा नाही एमडी ड्रग्स देखील अनेकदा पकडला गेले आहे. मोठी कारवाई देखील झाली आहे. हे सर्व सुरू असताना नशेचा गोरखधंदा थांबत नाहीय.ही चिंतेची बाब आहे. महाविद्यालयीन आणि शाळकरी मुलांना ड्रग्स आणि गांजा विक्री केलं जात असल्याचं बोललं जात आहे ।