अडचणीत मित्राला बोलावणे तरुणीला पडले महागात, पीडितावर लैंगिक अत्याचार ।

  • अडचणीत मित्राला बोलावणे तरुणीला पडले महागात, पीडितावर लैंगिक अत्याचार ।
डोंबिवली : डोंबिवलीतील धक्कादायक घटना घडली आहे.
मैत्रिणीच्या आई-वडिलांनी तरुणीला बेदम मारहाण केली म्हणून मदतीसाठी मित्राला बोलावलं ,मदत करण्यासाठी आलेल्या मित्रानेच केला बलात्कार या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. तरुणीच्या मदतीसाठी शिवसेना पदाधिकारी धावले असून  ,मानपाडा पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या आहेत. अनाथ तरुणीला तिच्या मैत्रीणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. तिने स्नॅपचॅट वर मित्र झालेल्या तरुणाला मदतीसाठी बोलवुन घेतलं. मात्र या तरुणाने पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याच्या पाहण्याने त्या पीडित तरुणीला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तिच्यावर बलात्कार केला तिच्या मोबाईल घेऊन पसार झाला. पीडित तरुणी मदतीसाठी थेट डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत पोहोचली, कल्याण ग्रामीण शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी शिवसेना महिला आघाडीला पीडित तरुणीच्या मदतीसाठी पोलीस स्टेशनला पाठवले.  पोलिसांनी मोठ्या शिताफीने क्रिश भोईर नावाच्या या नराधमाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान डोंबिवलीतील राहणारी तरुणी एका खाजगी ठिकाणी नोकरी करते या घटनेने नक्की विश्वास कोणावर  ठेवावा असा प्रश्न उपस्थित होत आहे  ।