खडवली नदी जवळ आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले ,७०० रुपये चोरल्याच्या संशयातून दगडाने ठेचून मित्राने केली मित्राची हत्या ,पोलिसांच्या श्वानामुळे उघडकीस आले हत्या गूढ ।

  • खडवली नदी जवळ आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले ,७०० रुपये चोरल्याच्या संशयातून दगडाने ठेचून मित्राने केली मित्राची हत्या ,पोलिसांच्या श्वानामुळे उघडकीस आले हत्या गूढ ।

कल्याण :  तीन दिवसांपूर्वी घडवली नदी परिसरात आढळलेल्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात टिटवाळा पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे पोलीस श्वानाच्या मदतीमुळेच आरोपी पोलिसांच्या हाती लागला . पाचशे रुपये चोरल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे .राजेश प्रभुळकर असे मयत इसमाचे नाव असून त्याचा मित्र योगेश कदम यांनी सातशे रुपये चोरी केल्याच्या संशयातून राज्याचे दगडाने ठेचून हत्या केली . टिटवाळा पोलिसांनी योगेश कदम याला बेड्या ठोकल्या आहेत । कल्याण टिटवाळा जवळील खडवली नदी परिसरात तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, पोलीस अधिकारी नितीन मुदगुन, महेश कदम तसेच ठाणे एलसीबीचे अधिकारी भाऊसाहेब गायकवाड आणि जयवंत वारे यांच्या पथकाने तपास हाती घेतला.तपासादरम्यान श्वान पथकाला घटनास्थळी फिरवण्यात आले. श्वानाने पोलिसांना थेट खडवली रेल्वे स्थानकापर्यंत मार्ग दाखवला. खडवली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीसह त्यानंतर पोलिसांनी खडवली ते मुंबई पर्यंत सुमारे 300 सीसीटीव्ही फुटेज तपासले असताया पोलिसांना आरोपीच्या संपर्कातील एक व्यक्ती सापडली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मृताची ओळख राजेश प्रभुळकर अशी पटली, तर आरोपी योगेश कदम असल्याचे समोर आले. दोघेही एकमेकांचे मित्र असून एकत्र केटरर्स काम करत होते.पोलिस तपासात ,आरोपी योगेश कदम आणि राजेश प्रभुळकर हे खडवली नदी परिसरात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पार्टीही केली होती. दरम्यान, योगेशला संशय आला की त्याच्या पैशांपैकी सुमारे ७००रुपये राजेशने चोरले. यावरून दोघांमध्ये वाद झाला.वादाच्या भरात योगेश कदम याने दगडाने ठेचून राजेश प्रभुळकर याची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला.दरम्यान, आरोपी योगेश कदम हा राजेश प्रभुळकर याची हत्या करून मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या प्रकरणातही वाँटेड होता. योगेश कदम यांच्यावर आणखी एक हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे .टिटवाला कल्याण तालुका ठाण्याच्या पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे ।