आगीत सर्व काही नाहीसे झालेल्या ठाण्यातील गुजर कुटुंबाला डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा मदतीचा हात ।

  • आगीत सर्व काही नाहीसे झालेल्या ठाण्यातील गुजर कुटुंबाला डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा मदतीचा हात ।

ठाणे : शास्त्रीनगर परिसरातील श्री. विजय गुजर यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांत भस्मसात झाला. आयुष्यभर कष्ट करून उभारलेलं घर आणि संसार डोळ्यांसमोर नष्ट झाल्याने गुजर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’चे पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानग्रस्त घराची पाहणी करत गुजर कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. संकटाच्या काळात मदतीसाठी तत्पर राहणे हेच शिवसेना आणि शिवसैनिकांचे कर्तव्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कठीण प्रसंगी गुजर कुटुंबीयांना दिलासा देण्याबरोबरच त्यांचे आयुष्य पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी आर्थिक व इतर मदत करण्याची जबाबदारी ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ने स्वीकारली आहे. श्री. विजय गुजर यांचे घर आणि संसार पुन्हा उभे राहेपर्यंत शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ।