- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नतेमुळे कल्याण डोंबिवलीसह -आसनगाव,कसारा,कर्जत खोपवली परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक उपचारांची सुविधा ।
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरातील आरोग्य सेवेत मोठी भर पडणार असून, आता नागरिकांना कल्याण डोंबिवलीसह,आसनगाव,कसारा, कर्जत , खोपवली परिसरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया , सर्जरी तसेच विविध वैद्यकीय तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यासाठी बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण प., शक्तीधाम रुग्णालय व गौरीपाडा रुग्णालय येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची संलग्न करण्यात आले आहे. या माध्यमातून महापौर दालनात २० एप्रिल २०२६ रोजी मेडिकल महाविद्यालय व कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभाग प्रशासन यांच्यात संबतीत ३ वर्षाच्या कालावधीसाठी करार करण्यात आला असून त्यांचे रुग्णालय उभारण्यापर्यंत पुढील कालावधीसाठी वाढवण्यात येणार आहेत. यावेळी महापौर हर्षाली चौधरी,उप महापौर राहुल दामले,महापालिका आयुक्त अभिनव गोयल,शिवसेना ( शिंदे ) पक्षाचे गट नेते विश्वनाथ राणे,भाजप गट नेते शशिकांत कांबळे,सभागृह नेते वरुण पाटील,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गट नेते उमेश बोरगावकर,काँग्रेस गट नेत्या कांचनताई कुलकर्णी, उप आयुक्त आरोग्य विभाग उप आयुक्त प्रसाद बोरगावकर,उप आयुक्त योगेश गोडसे, आरोग्य विभाग आरोग्य अधिकारी डॉ.दीपा शुक्ला , वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ डी. ई . ए.एन.संतोष वर्मा,निवासी उप डी. ई.ए.एन.डॉ.भूषण वानखेडे सह डॉक्टर,नर्स स्टाफ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार अंबरनाथ येथे नव्याने सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची या रुग्णालयांची संलग्नीकरण करण्यात येत असून,यामुळे नागरिकांना प्रगत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत. विशेष म्हणजे ,या माध्यमातून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ( सर्जरी ) ,अतिदक्षता विभाग ( ICU ) सेवा,तसेच विविध वैद्यकीय तपासण्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून, स्थानिक स्तरावर अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. सुरुवातीला बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात विशेष बाह्यरुग्ण सेवा सुरू होणार असून, पुढील टप्प्यात ICU व इतर विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहेत.त्या नंतर गौरीपाडा रुग्णालयात स्त्रीरोग व बालरोग विभाग सुरू करण्यात येणार असून ,शक्तीधाम रुग्णालयातही इतर अवश्य विभाग टप्याटप्याने सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे कल्याण – डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रा सह आसनगाव,कसारा,कर्जत,खोपवली परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम,तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि सर्वसमावेश आरोग्य सेवा मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे ।
