कोणतीही कर दर वाढ नसलेले कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सन 2025-26 चे रु.2744.99 कोटी जमा व रु.2172.22 कोटी खर्चाचे सुधारीत अंदाजपत्रक आणि रक्कम रु.3186.49 कोटी खर्चाचे आणि रक्कम रु.3186.60 कोटी जमा रक्कमेचे व रक्कम रु.10.51 लक्ष शिल्लक रक्कमेच्या सन 2026-27 च्या मूळ अंदाजपत्रकाचे आयुक्त अभिनव गोयल यांचेकडून मा.महासभेस सादरीकरण !

  • कोणतीही कर दर वाढ नसलेले कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सन 2025-26 चे रु.2744.99 कोटी जमा व रु.2172.22 कोटी खर्चाचे सुधारीत अंदाजपत्रक आणि रक्कम रु.3186.49 कोटी खर्चाचे आणि रक्कम रु.3186.60 कोटी जमा रक्कमेचे व रक्कम रु.10.51 लक्ष शिल्लक रक्कमेच्या सन 2026-27 च्या मूळ अंदाजपत्रकाचे आयुक्त अभिनव गोयल यांचेकडून मा.महासभेस सादरीकरण !
कल्याण : आज कोणतीही कर दर वाढ नसलेले कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सन 2025-26 चे रु.2744.99 कोटी जमा व रु.2172.22 कोटी खर्चाचे सुधारीत अंदाजपत्रक आणि रक्कम रु.3186.49 कोटी खर्चाचे आणि रक्कम रु.3186.60 कोटी जमा रक्कमेचे व रक्कम रु.10.51 लक्ष शिल्लक रक्कमेच्या सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मा.महासभेस सादर केले.
  *या अंदाजपत्रकातील ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :-*
_*जमा बाजू :-*_
1) सन 2026-27 या वर्षात मालमत्ता करापोटी रु.600.01 कोटी उत्पन्न अपेक्षित.
2) शासनाकडून जीएसटी अनुदान व मुद्रांक शुल्का पोटी रक्कम रु.510.03 कोटी अनुदान अपेक्षित.
3) सन 2026-27 या आर्थिक वर्षात पाणी पट्टी वसुली पोटी रक्कम रु.101 कोटी उत्पन्न अपेक्षित.
4) शासकीय अनुदाने व अंशदाने अंतर्गत शिक्षण वेतन अनुदानासह रक्कम रु.115.06 कोटी अनुदान अपेक्षित.
5) विशेष अधिनियमाखाली वसुली रु.526.30 कोटी उत्पन्न अपेक्षित.
6) रु.28.85 कोटी संकिर्ण उत्पन्न अपेक्षित.
*_भांडवली उत्पन्न :-_*
 यामध्ये सन 2026-27 वर्षाकरीता रु.829.25 कोटी अनुदान अपेक्षित.
*_खर्च बाजू :-_*
  सन 2026-27 मध्ये रु.1654.08 कोटी रुपये महसुली खर्च अपेक्षित व रु.1524.20 कोटी भांडवली खर्च अपेक्षित.
_*खर्चाच्या तरतूदी :-*_
* महापालिका निधीतून कल्याण (पूर्व) भागातील युटाईप रस्ता व श्री मलंग रोड, चेतना शाळा ते नेवाळी नाका, मांडा टिटवाळा भागातील विविध रस्त्यांची कामे, ठाणगे वाडी येथील रस्ता अशी अनेक रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
* मोठा गांव रेल्वे फाटकाच्या ठिकाणी महापालिकेने रेल्वे उड्डाणपुल प्रस्तावित केला आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपुल वाहतुकीस अपुरा पडत असल्याने, सदर ठिकाणी नविन दोन पदरी अतिरिक्त उड्डाणपुल बांधण्याचे प्रस्तावित आहे.
* महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले कलामंदिराचे अ‍धुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. याच योजनेच्या अंतर्गत कल्याण पश्चिम भागात आगरी, कोळी, कुणबी, वारकरी सांस्कृतिक भवन, बारावे येथील आरक्षित भुखंडावर डॉ.आनंदीबाई जोशी उद्यान, सुभाष मैदान येथील स्टेडियम ही कामे लवकरच सुरु करण्यात येत आहेत.
* महापालिकेच्या फंडातून आधारवाडी, लालचौकी, कल्याण (पश्चिम), बैलबाजार कल्याण (पश्चिम), मुरबाडा रोड कल्याण (पश्चिम), विठ्ठलवाडी कल्याण (पूर्व), थारवाणी कॉम्प्लेक्स जवळ टिटवाला (पश्चिम), मोक्षधाम स्मशानभुमी डोंबिवली (पूर्व), पाथर्ली डोंबिवली (पूर्व), कोळेगाव डोंबिवली (पूर्व) येथे स्मशानभूमी पुर्ननिर्माणचे काम सुरु करण्यात आले आहे.
* तर, मुलभूत सुविधाअंतर्गत कॅसारिओ डोंबिवली (पूर्व) व माणेरे येथे स्मशानभूमीचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे.
* महापालिका क्षेत्रातील उद्याने व मैदाने येथे सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे. मौजे बारावे येथे सुसज्ज बगीचा विकसीत करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. या उद्यानात ऑटीझम व्हिलेज संकल्पना राबविण्यात आली आहे. तसेच मनपा क्षेत्रात 15 लहान उद्याने, कल्याण (प.) Vasant Valley परिसरात, डॉ.आनंदीबाई जोशी उद्यान व भोपर टेकडी सुशोभिकरण प्रस्तावित आहे.
* अमृत ग्रीन स्पेस अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानातून 2 वृक्ष छाटणी वाहने खरेदी करणे व ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग युनिट उभारणे प्रस्तावित आहे.
* पाथर्ली येथील जलकुंभाची पुर्नबांधणी करुन 2.00 द.ल.लि. क्षमतेचा नवीन जलकुंभ उभारणे प्रस्तावित असून, आवश्यकतेनुसार अन्य ठिकाणी नवीन पंप बसविणे प्रस्तावित आहे.
* नेतीवली जलशुध्दीकरण केंद्राची जुनी पडलेली रिटेनिंग वॉल बांधणे व CLF दुरुस्ती करणेचे काम या वर्षात प्रस्तावित आहे.
* महापालिका हद्दीतील विविध ठिकाणी नागरीकांच्या व पर्यटकांच्या सुविधेसाठी 24 युनिट सेल्फ क्लिनींग ईको-टॉयलेट उभारणे प्रस्तावित आहे.
* पाणी पुरवठ्याचे Digitalization करण्यात येणार असून यात Flow Meter, SCADA & Digital Twin Software द्वारे पाणी नियंत्रण केले जाणार आहे.
* अृमत 3.0 योजनेअंतर्गत मनपातील 27 गाव व डोंबिवली पश्चिम साठी 275 द.ल.ली. क्षमतेचे जलशुध्दीकरणे केंद्र बांधणे, विविध ठिकाणी जलकुंभ व संपपंपगृह बांधणे, वितरण व्यवस्था मजबुतीकरण करणे व मलनि:सारण वाहिन्या टाकणे व इतर अनुषंगीक कामे करण्यात येणार आहेत.
* भटक्या श्वानांकरीता बैल बाजार येथील श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यात येत असून, डोंबिवली क्षेत्रामध्ये नवीन श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.
* डोंबिवली येथे भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे.
* घनकचरा व्यवस्थापन करीता प्रक्रिया क्षमता वाढविणेकरीता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत पुढील नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत :- 1) उंबर्डे येथे एमएम आरडीए मार्फत DBFOT तत्वावर 750 टीपीडी क्षमतेचा WTE (Waste to Energy) क‍चऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारणे. 2) बारावे येथील आरक्षित भूखंड क्र.151 येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांचे मार्फत 200 टीपीडी क्षमतेचा बायो सीएनजी प्रकल्प उभारणे. 3) कल्याण पश्चिम बारावे येथील 35 टीपीडी बायो सीएनजी प्लँटचे पुनर्वसन करुन 60 टीपीडी करणे. 4) हॉर्टीकल्चर वेस्ट करीता बारावे येथे ब्रिकेटींग प्लॅन्ट उभारणे. 5) मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्याकरीता Invineration प्लँन्ट उभारणे. 6) बांधकाम व तोडकाम C & D Waste कचऱ्याकरीता मांडा येथे प्रक्रिया केंद्र उभारणे.
* धुळशमन प्रकल्प रस्त्याचे UTWT ने काँक्रिटीकरण करणे, कल्याण येथे 2 व डोंबिवली येथे 2 ड्राय मिस्ट फाउंटन 1 ठिकाणी Out Door Air-purification System व स्मशानभूमींमध्ये Air Purification System बसविणे प्रस्तावित आहे.
* मनपा शालेय विद्यार्थ्यांना हेपेटायटीस-ए लसीकरणे, मनपा शाळांकरीता सॅनिटरी नॅपकिन व्हेडींग मशीन बसविणे, मैदानी, 100 मीटर ट्रॅक, लांब उडी, पीट, सँड पीट, शॉर्ट पूट तयार करणे तसेच Sports Kit देणे प्रस्तावित आहे.
* ज्येष्ठ नागरीकांकरीता 10 (मॉडेल) कट्टे निर्माण करण्यात येत आहेत.
* तृतीय पंथीयांचे स्वयं रोजगाराकरीता 8-10 प्रकारची प्रशिक्षणे आयोजित करण्यात येत आहेत.
* सन 2026-27 साठी HRMS प्रणाली, Whats app Chatbot, Network Security Audit, सर्व प्रभागांमध्ये नव्याने नेटवर्किंग करणे प्रस्तावित आहे.
* विविध विभागांसाठी दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली – Document Management System राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
* नविन आर्थिक वर्षात विद्यार्थी पटसंख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये आवश्यकतेनुसार अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम प्रस्तावित आहे.
* महापालिका शाळांमध्ये अत्याधुनिक टेलिस्कोप उपलब्ध करवून देवून Astronomy Club स्थापन करण्याचे नियोजित आहे.
* बालवाड्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी रु.50 लक्ष इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
* खुल्या बाजारातून भांडवल उभारणी अंतर्गत महापालिकेचे विशेष महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणेकरीता रु.200 कोटीचे कर्ज रोखे Municipal Bonds उभारणी करणे प्रस्तावित असून, त्यातून प्राप्त होणाऱ्या रक्कमेतून निधी उभारुन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत.
* विकास प्रस्तावांच्या माध्यमातून विकास शुल्क, Ancillary FSI Premium Charges व इतर माध्यमातून एकुण रु.241 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त करण्याचे महापालिकेचे उद्दीष्ट असून, स्मार्ट पार्किंग व जाहिरातीच्या निविदांद्वारे अंदाजे 20 ते 25 कोटी वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे.
* तसेच मालमत्ता विभागातून महापालिकेच्या बांधीव मिळकतींचे भाडे जाहिराती व अन्य उत्पन्नाद्वारे रु.48 कोटी महसुल अपेक्षित धरण्यात आला आहे ।