श्री मुंब्रेश्वर महादेव नववर्ष स्वागत समितीच्या वतीने,गुढीपाडव्यानिमित्त मुंब्र्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली ।

  • श्री मुंब्रेश्वर महादेव नववर्ष स्वागत समितीच्या वतीने,गुढीपाडव्यानिमित्त मुंब्र्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली ।

ठाणे : मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त मुंब्रा शहरामध्ये श्री मुंब्रेश्वर महादेव नववर्ष स्वागत समितीच्या वतीने मुंब्रा स्टेशन येथील शनी मारुती मंदिर परिसर ते मुंब्रेश्वर महादेव मंदिर अशी भव्यदिव्य स्वागत यात्रा काढण्यात आली. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सर्व धर्मियांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. गेली पंधरा वर्षे मुंब्रा शहरामध्ये नववर्षा निमित्त सर्वधर्मियांच्या सहभागातून स्वागत यात्रा काढण्यात येते. यामध्ये मुंब्रा कौसा तसेच दिवा, शिळ, कल्याण फाटा, चौदा गावे परिसर येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माजी आमदार व मुंब्रेश्वर महादेव नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष सुभाष भोईर यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली. या स्वागत यात्रेमध्ये संघर्ष सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा ऋता आव्हाड, ठा. म. पा. विरोधी पक्ष नेते अश्रफ पठाण ,नगरसेवक सुधीर भगत, पल्लवी जगताप, वेदिका पाटील, राजन किणे, सैफ पठाण, माजी नगरसेवक सय्यद अली, विजय कदम, मोरेश्वर किणे, महेंद्र कोमुर्लेकर, उषा आढळ, जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश पाटील, सुमित सुभाष भोईर, सुदाम भगत, मोतीराम भगत, आनंद पाटील, उपस्थित होते. या शोभायात्रेत, हिरालाल विश्वकर्मा, इसाक बिराजदार सर, अविनाश पवार, कांती वाघमारे, अनिल भगत, मनोज प्रजापती, लक्ष्मण पाटील, रमेश पाटील, नितीन मोरे, कुणाल पाटील, जयसिंग राजपुरोहित आदी सर्वधर्मीय समाजातील लोक सहभागी झाले होते.या शोभायात्रेमध्ये एकविरा आईची पालखी, ध्वज पथक, ढोल पथक, चलचित्र, कलश यात्रा, गोंधळी, आराध्याचा मेळा, साहसी खेळ, लेझीम पथक, भजन मंडळे, विविध वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते. मुंब्रेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात येऊन यात्रेची सांगता झाली. त्यावेळी स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांना विविध पारितोषिके व महिलांना पैठणी लकी ड्रा देवून सन्मानित करण्यात आले. या स्वागत यात्रेला पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व त्यांचे सहकारी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल अहिरे पोलीस दलासह कार्यरत होते ।