- भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक ।
डोंबिवली : मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रिया (S.I.R.)च्या अनुषंगाने भाजपा डोंबिवली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी डोंबिवली शहरात सुरू असलेल्या S.I.R. मोहिमेचा सविस्तर आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी यादी क्रमांक २३०, पेंडसे नगर येथील १०० टक्के S.I.R. फॉर्म भरून घेतल्याबद्दल श्रीमती राजलक्ष्मी अय्यर यांचा सत्कार करण्यात आला. मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत प्रभावी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. या बैठकीस भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल दामले, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, नगरसेवक मंदार हळबे, भाजपा डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षा प्रियाताई जोशी, जुनी डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, प्रज्ञेश प्रभूघाटे, कल्याण जिल्हा संघटन सरचिटणीस रवी सिंग ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ।
