शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतची पुढील सुनावणी ४ ऑगस्टला होणार ।

  • शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतची पुढील सुनावणी ४ ऑगस्टला होणार ।

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या अधिकाराबाबतची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ३० जून २०२६ पासून सुरू झाली आहे, ज्यामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाच्या युक्तिवादासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी २०२३ च्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले असून, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे न्यायालयाने आदेश दिले. पुढील सुनावणी मंगळवारी ४ ऑगस्टला होणार आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड केले, त्यांच्यासोबत ४० आमदार आणि १० अपक्षांची ताकद होती. त्यानंतर दोन्ही शिवसेनेचा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी मागील ३ वर्षे झाली. परंतु अंतिम निकाल अद्याप लागू शकलेला नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरुद्ध ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले कि, गेल्या चार वर्षांमध्ये सुनावणी होत नसल्यामुळे या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्याची गरज आहे. २०२३ मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती आणि सध्या २०२६ सुरू आहे. आताही सुनावणी सुरूच आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं. ४० आमदारांना घेऊन ते बाहेर पडले आणि थेट शिवसेना नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. दोन्ही पक्षांचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला तेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह असलेला धनुष्य-बाण हे दोन्ही एकनाथ शिंदेंना दिलं. एकनाथ शिंदे जून २०२२ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान शिवसेना कुणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. मागील तीन वर्षांपासून या प्रकरणी निर्णय आलेला नाही. आता दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार आहेत, मात्र कोर्टाने पुढची तारीख दिली आहे ।