लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत विद्यार्थ्यांसाठी विदुषी शुभदा पराडकर यांचे विशेष मार्गदर्शन ।

  • लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत विद्यार्थ्यांसाठी विदुषी शुभदा पराडकर यांचे विशेष मार्गदर्शन ।

पनवेल :  लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका व विदुषी शुभदा पराडकर या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. संगीत क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तसेच शास्त्रीय संगीत,ठुमरी,दादरा,टप्पा आणि इतर संगीतप्रकारांमध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. संगीताचा नियमित रियाज, सादरीकरणातील बारकावे, स्पर्धा व परीक्षांची तयारी, गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व, तसेच संगीत क्षेत्रातील विविध करिअर संधी याविषयी विदुषी शुभदा पराडकर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हा मार्गदर्शनपर कार्यक्रम मंगळवार, दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत पनवेलमधील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असून प्रवेश विनामूल्य आहे. संगीत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विविध संगीत परीक्षा देणारे विद्यार्थी, नवोदित गायक-गायिका, संगीत शिक्षक, पालक तसेच संगीतप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या अनोख्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभवी कलाकार विदुषी शुभदा पराडकर यांचे थेट मार्गदर्शन मिळण्याची संधी लाभणार असून, संगीत क्षेत्रातील त्यांच्या भावी वाटचालीसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पनवेल व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी रायगड भूषण पं.उमेश चौधरी ९३२४८२४२०५, विनोद तोडेकर ७०४५८२२५४८ किंवा अनिल कोळी ९७६९४०९१६१ यांच्याशी संपर्क साधावा ।