छायाचित्रे चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वकील महेश जाधव याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ।

  • छायाचित्रे चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वकील महेश जाधव याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ।

कल्याण : कल्याण न्यायालयातील महिला वकिलांसह अशिलांच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती आणि छायाचित्रे चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वकील महेश जाधव याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करत पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. तपासादरम्यान आरोपीने गोपनीय डेटा नेमक्या कोणत्या उद्देशाने चोरला, त्याचा गैरवापर झाला आहे का, तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य केली. या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत असून, डेटा चोरीमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे ।