शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण , आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ।

  • शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण , आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ।

डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिवसेना पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रमेश म्हात्रे यांना रविवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार म्हात्रे विष्णूनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना आगामी ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील अन्य एका महिला आरोपीला यापूर्वी अटक करण्यात आली असून, तिला उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर उच्च न्यायालयामध्ये पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार असून, म्हात्रे यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार ते २२ तारखेला न्यायालयात आपले उत्तर सादर करणार आहेत ।