शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला ।

  • शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला ।

डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. भेटीदरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासन, DHARAPA आणि NIMA यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठीच्या उपायांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी डॉक्टरांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत, कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही सरकारकडून संरक्षण दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आरोग्य कर्मचारी सुरक्षित आणि निर्भय वातावरणात सेवा देऊ शकतील, यासाठी राज्य सरकार आवश्यक ती पावले उचलेल आणि संबंधित मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले ।